करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा – वाशिंबे बस सुरु करावी ; शाळा सुरु असताना बस नसल्याने नुकसान

करमाळा समाचार 

कोरोना महामारीच्या काळामध्ये संपुर्ण देशामध्ये लॉक डाऊन होते , कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने एस टी महामडळाने एसटी प्रवासी वाहतुक बंद केली होती. सध्या प्रवासी वाहतुक सुरु झाली आहे,  परंतु करमाळा वाशिंबे / मांजरगाव या मार्गावरील बसेस चालु झाल्या आहेत. परंतु सकाळी ८ वाजता करमाळा -वाशिंबे ही बस अजुन करमाळा आगाराने सुरु केलेली नाही. सध्या शाळा महाविद्यालय चालु झाले आहेत.

९ वी च्या पुढचे वर्ग चालु झाले आहेत. मांजरगाव, वीट, करमाळा, उमरड याठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जातात त्यांच्या शाळेच्या वेळेनुसार सकाळी ८ ला करमाळा येथुन निघणारी बस चालु होणे गरजेचे असुन ती बस सुरु करावी तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवाशी पास आवश्यक आहेत त्यांना आगार प्रमुखांनी पास उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी मांजरगावच्या सरपंच सौ. गायत्री महेश कुलकर्णी यांनी करमाळा बस स्थानकाचे आगार प्रमुख यांचे कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE