करमाळासोलापूर जिल्हा

नागराज मंजुळे यांच्या हस्ते आज करमाळा भुषण पुरस्कार वितरण

नागराज मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमधे ग्रामसुधार समितीचा “करमाळा भूषण पुरस्कार” ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.राजेंद्र दास सर यांना जाहीर -.

१३ ऑगस्टला यशकल्याणी सेवाभवन येथे पुरस्कार वितरण..!
करमाळा : ग्रामसुधार समितीच्यावतीने दिला जाणारा सन्मानाचा करमाळा भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. यशकल्याणी सेवाभवन परिसर येथे होणार आहे.
या पुरस्काराचे वितरण सिनेअभिनेते व दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे यांचे हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील हे राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी तसेच साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे; असे आवाहन ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष अॅड. डॉ. बाबूराव हिरडे, उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे व सचिव डी.जी.पाखरे यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE