करमाळासोलापूर जिल्हा

बॅंकेला फसवणुक प्रकरणी भाजपाच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल ; करमाळ्यातही जोरदार चर्चा

करमाळा समाचार 

अहमदनगर जिल्ह्यातल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार तथा अर्बन बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी, तत्कालीन शाखा अधिकारी घनशाम अच्च्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि इतर संचालक मंडळ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शाखा अधिकारी मारूती रंगनाथ औटी (वय 45, रा. पाईपालाईन रोड, अहमदनगर) यांनी दिली. त्यानुसार अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी संगनमताने कट रचून बँकेची 3 कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नगर अर्बन बॅकेंची करमाळ्यातही एक शाखा आहे. तरी तालुक्यात यावरुन जोरदार चर्चा सुरु आहेत.

7 ऑक्टोबर 2017 ते 10 डिसेंबर 2020 या दरम्यान बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि संचालक मंडळ सदस्य यांनी कट रचून, संगनमत करुन, बँकेस खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार करून ठेवीदार, सभासद यांचा विश्वासघात केला आहे. सदर 3 कोटी रूपयांची रक्कम या आर. बी कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराल एंटरप्राइजेस, संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेवून बँकेच्या 3 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे.

आरोपींनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव व खोटे कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी, अफरातर व फसवणूक केल्याप्रकरणी भादवी कलाम 406, 420, 465, 467, 471 व 120 ब प्रमाणे सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाची चौकशी आता कोतवाली पोलीस करत आहे. नगर अर्बन बँकेवर प्रशासक देखील नेमण्यात आला होता. आणि आता भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE