E-Paperकरमाळाताज्या घडामोडीराजकीय

करमाळ्यात ‘या’ ठिकाणी शिंदे, जगताप गट व बागल गट दिसणार एकत्र ? ; सत्तासंघर्ष असल्याने निवडणुक अटळ

प्रतिनिधी सुनिल भोसले

पांडे ग्रामपंचायत निवडणूकीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होत असली तरी ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता नसल्याचे गाव पुढाऱ्यान कडुन बोललं जात आहे. सर्व सामान्य जनतेची बिनविरोध काढण्यासाठी धडपड असली तरी सत्तेला चिकटून बसलेले खुर्ची सोडण्यास तयार नाहीत.

मलाच पदाचा मान मिळावा तसेच पांडे गावातील निवडणूक विकासाच्या मुद्यावर कधीच झाली नाही असेही लोकांचे म्हणणे आहे. फक्त नाते गोते जवळचा तसेच शिकलेला नसला तरी पैसावाला असावा आणी कोणत्याही पक्षाचा‌ अथवा गटाचा कार्यकत्ता असावा नेहमी या पध्दतीने निवडणूक होत असते.

गावगाडा चालवण्यासाठी बुध्दीवान माणसाची गरज असते. परंतु अशा माणसाला डावलुन निवडणूक होत असते अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. पांडे ग्रामपंचायत मध्ये पांडे, धायखिंडी, खाबेंवाडी मिळुन गृप ग्रामपंचायत आहे. या निवडणुकीत माजी आमदार पाटील गट स्वतंत्र लढणार ‌असल्याची चर्चा आहे.

ads

तर विद्यमान आमदार शिंदे गट, जगताप गट, बागल गट,असी आघाडी होण्याची शक्यता आहे. यामध्ये नव्याने उभारी घेत असलेली शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे हा सुद्धा गट निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा आहे. जर सर्व सामान्य नागरिकांना गाव पुढारी एकत्र करण्यास यश आले. तर इतिहासात नोंद घ्यावी लागेल असे जानकार नागरिकांत चर्चा होताना दिसत आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE