करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्याच्या राजकारणात खळबळ ; सावंत, देवी व बागल भेटीने चर्चाना उधान

करमाळा समाचार 

विद्यमान आमदार संजय मामा शिंदे गटाचे दोन दिग्गज नेते व बागल गटाचे नेते एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत. होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये हे तिघे जण एकत्र येण्याची कुजबूज सुरू होती. तर आज समोरासमोर एकत्र येत त्यांनी याबाबत शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र यासंदर्भात सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्याशी बातचीत केली असता कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्यातरी सदरची भेट ही गुलदस्त्यातच राहण्याची शक्यता आहे.

नगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या शक्यता आहे. या निमित्ताने मागील अनेक दिवसांपासून सावंत, देवी व बागल हे तीन गट एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. परंतु तिन्ही गटाच्या वतीने याकडे दुजोरा देण्यात आलेला नव्हता किंवा आजही कोणीही त्या पद्धतीने जाहीर वक्तव्य केलेले दिसून येत नाही. परंतु सावंत काही दिवसांपासून वेगळ्या भूमिकेत जाण्याची शक्यता होती शिवाय देवी यांचीही नगर अध्यक्षपदाबाबत ची इच्छा लपून राहिलेली नाही.

त्यामुळे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे गटाचे हे दोन दिग्गज नेते आज दिग्विजय बागल यांच्यासोबत आढळून आल्याने हा येणाऱ्या काळात युतीचा संकेत तर नाही ना असा संशय निर्माण होत आहे. मागील निवडणुकांमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गट एकत्र निवडणूक लढवत जनतेतून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैभव राजे जगताप यांची निवड करण्यात यशस्वी झाले होते. त्यावेळी देवी सावंत व शिंदे गट हे विरोधात लढले होते. शिंदे गटाकडून नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते.

विधानसभा निवडणुकांवेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजय मामा शिंदे यांना दिला होता. त्यांच्या पाठिंब्या शिंदे गट विधानसभेत बाजी मारु शकला आहे. नंतर आता करमाळा नगर परिषदेत आ. संजय मामा शिंदे हे कोणती भूमिका घेतात यावर शिंदे गटात इतर नेत्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आता मागील निवडणुकांमध्ये साथ देणाऱ्या सावंत – देवी गटाला सोबत घेऊन कोणाला संधी देणाए याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये लागून राहिली आहे. सावंत व देवी गटातील कार्यकर्त्यांमध्ये थोडा असंतोष असून संधी न मिळाल्यास येणाऱ्या निवडणुकीत ती वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही व याच नाराजीचा फायदा बागल गट उचलून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची कौटुंबिक कार्यक्रमातून झालेली भेट ही उद्याची राजकीय घडामोडी तील प्रमुख बैठक घडेल काय याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सदरच्या भेटीदरम्यान बागल गटाचे दिग्विजय बागल, सावंत गटाचे सुनील सावंत, नगरसेवक संजय सावंत, दादासाहेब सावंत, देवी गटाचे नगरसेवक कन्हैयालाल देवी व बागल समर्थक नगरसेवक सचिन घोलप आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE