करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी गावागावांतुन मराठे हजेरी लावणार

करमाळा समाचार

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण जाहीर करून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या अमरण उपोषणाला करमाळा तालुक्यातील साखळी उपोषण करीत पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी शेकडो सकल मराठा समाज बांधव हे तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले आहेत. यावेळी विविध भागातून समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.

करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी 11 वाजता साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. तसेच तालुक्यातील पाडळी, घारगाव, बोरगाव, खडकी, देवळाली, फिसरे, तरडगाव, बिटरगाव, पोथरे, भोसे यासह तालुक्यातील इतर गावांनी पाठिंबा दर्शवत गावात पुढाऱ्यांना बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. तसेच शहारातील आंदोलनस्थळी रोज एका गावाने साखळी उपोषण करण्याचे ठरवले आहे. त्या पद्धतीने पहिल्या दिवशी व देवीचेमाळ येथील कार्यकर्त्यांसह तालुक्यातील इतर सकल मराठा समाजाचे उपस्थित होते. तर पुढेही शहरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशिवाय रोज एका गावाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी बोरगाव, शनिवारी पोथरे, रविवारी भोसे, सोमवारी तरडगाव, मंगळवारी जातेगाव अशा पद्धतीने संपूर्ण दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.

सदरच्या ठिकाणी तालुक्यातील विविध भागातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या आहेत. यावेळी वेगवेगळ्या गटतट व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही पाठिंबा दिला आहे. सकल मराठा समाजाशिवाय बहुजन संघर्ष सेना, मुस्लिम समाज, आरपीआय, दलित समाज, धनगर समाज यासह इतर समाजाचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE