मै नंगा आदमी हु जो उखाडना है उखाड लो ; ईडी नोटीसी वरुन राऊत भडकले
करमाळा समाचार
जर कुणी नामर्दाग्नी करत असेल तर शिवसेना त्याच बद्दतीने उत्तर देईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राजकीय दृष्टया संपवता येत नाही म्हणून केंद्रातील सरकारला ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स सारखी हत्यारे वापरावी लागत आहेत. बायकाच्या पदराआडून केलेली राजकीय खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा देखील इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस धाडली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तर मै “नंगा आदमी हु जो उखाडना है उखाड लो” असे म्हणत आव्हानच दिले आहे.


आमच्यासाठी सीबीआय, ईडी, आयकर महत्ताचा विषय नाही. कधीकाळी या संस्थांना प्रतिष्ठा होती, पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणे, कारवाई करणे म्हणजे एखाद्या पक्षाने राजकीय भडास काढणे हे गृहित धरले आहे. केंद्रातील भाजपला राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, म्हणून वापरावी लागत आहे.
ते म्हणाले की, शरद पवार असतील, एकनाथ खडसे असतील, प्रताप सरनाईक असतील. जे नेते राज्यात सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत होते जे दबावाला बळी पडत नाहीत, त्यांना कागदाचे तुकडे पाठवले जात आहेत. समोर येऊन लढा, शिवसेना नामर्दांना समोरासमोर येऊन त्याच पद्धतीने उत्तर देईल.
ईडी कार्यालयात सहसा कोणालाही प्रवेश मिळत नसताना भाजप नेत्यांना कशी माहिती मिळते? ईडीने भाजप कार्यालयात टेबल टाकल आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.