करमाळासोलापूर जिल्हा

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकारांची भुमिका अत्यंत महत्त्वाची

करमाळा समाचार 

लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन समाजात बदल घडवून आणुन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकारांची भुमिका अत्यंत महत्त्वाची असुन पत्रकारांनी निरपेक्षपणे पत्रकारिता करुन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहावे असे आवाहन लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक रमण परदेशी यांनी व्यक्त केले.

6 जानेवारी मराठी पत्रकार दिनाच्यानिमित्ताने लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था करमाळा यांच्या वतीने करमाळा शहरातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमप्रंसगी ते बोलत होते. पत्रकारिता हे सतीचे वाण असुन करमाळा तालुक्यातील पत्रकारिता संपुर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी असुन आम्हाला आपला सार्थ अभिमान असुन कोरोनाकाळातही आपल्या जीवाची बाजी लावून आपण पत्रकारितेचे महान कार्य केले असून इतिहासात आपल्या कार्याची नक्कीच दखल नोंद घेतली जाईल समाजसेवेचे हे व्रत चालु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे सल्लागार विश्र्वास काळे पाटील, बिपीन दोशी उपस्थित होते‌. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, पत्रकार नासीर कबीर अशोक नरसाळे संजय शिंदे दिनेश मडके, जयंत दळवी, शंभुराजे फरतडे, आशपाक सय्यद, शेखर स्वामी, संजय चौगुले, नागेश चेंडगे, अतुल बोकन, ओंकार झाडबुके लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखाधिकारी रमण परदेशी, कर्मचारी अजय शिंदे, दिपक रोकडे ,सुरज कोकाटे, बाळासाहेब नायकुडे, प्रसाद पलंगे, प्रकाश सोरटे उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE