करमाळाबार्शीसोलापूर जिल्हा

“या” युक्तीवादाच्या आधारावर खुनातील संशयीतास जामीन मंजुर ; चिखलठाण येथील घटना

बार्शी- करमाळा समाचार 


मौजे चिखलठाण येथे दिनांक ११/७/२०२० रोजी मयत अजित नवनाथ गलांडे याचा खून झालेला होता . सदर बाबत त्याचे वडील नवनाथ गलांडे यांनी उमेश राजाराम गलांडे , राजाराम बलभीम गलांडे, संतोष राजाराम गलांडे व इतर दोन विरुद्ध यांच्या वर करमाळा पोलिस स्टेशन येथे रितसर फिर्याद दिलेली होती. सदर फिर्यदिमध्ये मिथुन गलांडे व मयत अजित गलांडे हे दोघे ११/७/२०२० रोजी ७:३० वाजलेचे सुमारास चिखलठाण येथे गलांडे मळयाजवळ मासेमारी करत असताना त्यांच्यात व उमेश राजाराम गलांडे व इतर यांच्यात मासेमारी करण्याच्या जागेवरून भांडण झाले त्यात उमेश राजाराम गलांडे व इतर यांनी डोक्यात व छाती वर काठया ने मारून त्यांचा खून केला. तसेच मिथुन गलांडे यास गंभीर जखमी केल्या बाबत फिर्याद दाखल होती.

तदनंतर उमेश राजाराम गलांडे, संतोष राजाराम गलांडे, राजाराम बलभीम गलांडे यांना अटक करण्यात आली. उमेश गलांडे यांनी ॲड. निखिल पाटील यांचे मार्फत जामीनसाठी जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे धाव घेतली . सदर अर्जाचे सुनावणी वेळी आरोपींचे वतीने ॲड. निखिल पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून चार्ज शिट दाखल झालेले आहे व खटला मे. कोर्टात प्रलंबित आहे . तसेच खटला चालण्यास बराच अवधी लागणार असून यातील आरोपी नं.२ व ३ यांना या पूर्वीच जामिन मंजूर झालेला आहे त्याच तत्वावर सदरील उमेश राजाराम गलांडे यास जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद करण्यात आला . सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एस. पाटील यांनी आरोपी उमेश राजाराम गलांडे यांची ३०,०००/रुपयाच्या जतमुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली .

सदर प्रकरणात आरोपी तर्फे ॲड. निखिल पाटील, ॲड. विक्रम सातव, ॲड. दत्तप्रसाद मंजरतकर तर मूळ फिर्यादी तर्फे ॲड. धनंजय माने यांनी तर सरकार तर्फे ॲड. डी.डी. देशमुख यांनी काम पाहिले .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE