करमाळासोलापूर जिल्हा

जिल्ह्यासह करमाळ्यात आज पासुन कोविड लसीकरण ; पहिल्या टप्प्यात 550 लसी उपलब्ध

करमाळा समाचार 

तालुक्यात लस पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात ५५० लसींची पूर्तता करण्यात आली आहे. या सर्व लशी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे पोहच झाल्या आहेत. तर उद्या सकाळी प्रांत ज्योती कदम यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल डुकरे यांनी दिली आहे.

करमाळा तालुक्यात जवळपास तीन महिने उलटल्यानंतर कोरोना ने शिरकाव केला होता. त्यापूर्वी परिस्थिती अगदी सामान्य व कंट्रोलमध्ये होती. परंतु ज्या दिवशी पहिला रुग्ण मिळून आला त्याच्यानंतर मात्र रुग्ण संख्या वाढतच गेली होती. पण बऱ्याच रुग्णांना कोरोनाची लक्षणच दिसून येत नसल्याने त्यांना फक्त प्राथमिक उपचार करुन पंधरा दिवसांनी घरी सोडण्यात येत होते. कोरोना सगळीकडे वाढत असताना दरम्यान काळात ५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा बळीही गेला आहे.

करमाळा तालुक्यात लस ही सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. तालुक्यात ११०० आरोग्य कर्मचारी आहेत. सुरुवातीला ५५० लशी पोहचल्या आहेत. त्यामुळे ऱोज शंभर कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत जिल्हा कार्यालयातुनच यासंबंधी माहिती कळवली जाईल. त्याने स्वतःहून लस घेण्यासाठी संबंधित ठिकाणी पोहोचायचे आहे. लसीकरणा दरम्यान पाच कर्मचारी सर्व नियोजन पाहणार आहेत. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE