करमाळाकृषीसोलापूर जिल्हा

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे थकित विज बिलाबद्दल महत्वाची माहिती ; रब्बी आवर्तन लवकर सुरु – आ. संजयमामा

करमाळा समाचार

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे 51 लाख 32 हजार वीज बिल आज कृष्णा खोरे महामंडळातर्फे भरण्यात आल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे रब्बी आवर्तन तात्काळ सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यापूर्वीही आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाकडून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे 1 कोटी 23 लाख विज बिल जमा केलेले आहे .2020 मधील उन्हाळी आवर्तनाचे विज बिल 51 लाख 32 हजार नुकतेच जमा केल्यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

14 ऑक्टोबर 2020 रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे दहीगावच्या मुख्य कॅनॉल चे नुकसान झाले होते . कॅनॉल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून आवर्तन सुरू करण्यासाठी सध्या कोणताही अडथळा नाही. तसेच टप्पा दोन कुंभेज पंपगृह येथील चौथा पंप दुरुस्त केल्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजना प्रथमच 100% क्षमतेने चालेल असा विश्वास कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 चे उपअभियंता सी.ए .पाटील यांनी व्यक्त केला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE