करमाळासोलापूर जिल्हा

अक्षय दत्तात्रय तळेेकर यांची शिवस्फुर्ती समूहाच्या प्रदेश संघटकपदी निवड

करमाळा समाचार 

गडकोट संवर्धन ,सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारे केम ता.करमाळा,जि.सोलापूर येथील अभ्यासू व्यक्तिमत्व अक्षय दत्तात्रय तळेेकर यांची शिवस्फुर्ती समूहाच्या प्रदेश संघटकपदी निवड झाली आहे. गडकिल्ले संवर्धनासाठी कार्यरत असणारा समूह आदरणीय प्रा.संदीप कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे. शिव-शंभुंचे गडकिल्ल्यांचे संवर्धन व वारसा टिकला पाहीजे.

ज्याप्रमाणे मध्ययुगातील गडकिल्ले व शुर मावळ्यांची समाधी स्थळे व स्मारके आमची प्रेरणा स्थाने आहेत त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा ,कला क्षेत्र ,क्रिडा क्षेत्र संशोधन क्षेत्र ,माहीती तंत्रद्न्यान व साहित्य क्षेत्र हे आधुनिक काळातील गडकिल्ले होत. शिव-शंभू ,फुले-शाहू-आंबेडकर या महापुरूषांचा विचार म्हणजे महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील मैलाचा दगड होय.

गडकिल्यांचे संवर्धन व स्वचछता करणे , महापुरूषांच्या व मातांच्या विचारांचा प्रसार करणे, एेतिहासिक वारसा स्थळे आणि समाधी स्थळांचे संवर्धन करणे , स्पर्धा परीक्षा चळवळीसाठी अभ्यासिकांची निर्मिती करणे व मार्गदर्शन करणे, सामाजिक प्रश्नांवर कार्य करणे हे शिवस्फूर्ती समूहाचे ध्येय व उद्दिष्ट आहे. अशा या समूहाच्या प्रदेश संघटकपदी अक्षय तळेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE