“एक राखी सैनिकांसाठी” विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीचा उपक्रम
करमाळा समाचार -संजय साखरे
विश्व हिंदू परिषद करमाळा यांच्या दुर्गा वाहिनी संघटनेच्यावतीने करमाळ्यात “एक राखी सैनिकांसाठी” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करून त्यांना शास्त्राबरोबर स्वसंरक्षणासाठी शस्त्राचे शिक्षण या दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून दिले जाते .या वाहिनीचा एक उपक्रम म्हणून करमाळ्यातील आजी-माजी सैनिकांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये दुर्गा वाहिनीच्या महिला भगिनींनी जवानांना राख्या बांधल्या .या कार्यक्रमासाठी आजी-माजी सैनिक करमाळा तालुका अध्यक्ष श्री अक्रूर शिंदे, व त्यांचे सहकारी मेजर अनिल साखरे, मेजर अरुण काशीद, मेजर संपत अडसूळ, मेजर सुरेश आदलिंग, मेजर बाबासाहेब बोलभट, मेजर बाळनाथ इवरे व मेजर सुनील दौडे हे माजी सैनिक उपस्थित होते.
यावेळी शालेय विद्यार्थिनी कु.रिद्धी मोरे व ज्ञानेश्वरी मोरे यांनी जवानांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन दुर्गा वाहिनीच्या करमाळा प्रखंड संयोजिका सौ पायल परदेशी व सुप्रिया घोरपडे यांनी केले होते.
