कंत्राटी कर्मचारी साळुंखे यांच्या मृत्यु प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
वीजेचा झटका बसुन जीव जाऊ शकतो माहीत असताना वीज पुरवठा चालु ठेवल्याने यंत्र चालक संतोष प्रल्हाद मंडलीक याच्यावर तर सब स्टेशन प्रमुख असताना योग्य ती उपकरणे न पुरवल्यामुळे ओंकार शंकर परिट सहाय्यक अभियंता कंदर सबस्टेशन यांना सचिन साळुंखे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मृत्युस जबाबदार धरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मयताचा भावाने तक्रार दिल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन साळुंखे हा कंदर शिवारात वीज दुरुस्तीसाठी माने यांच्या शेताजवळ डीपी दुरुस्तीसाठी गेला होता. त्यावेळी त्याने मोबाईल वरुन फोन करुन यंत्र चालक संतोष मंडलीक यांना सुचना दिली व परवानगी घेत डीपी वर चढला त्यावेळी वीज पुरवठा सुरुच असल्याने सचिन हा जागीच ठार झाला. सदरची दुर्घटना शनिवारी दुपारी दोन च्या सुमारास घडली होती.

त्यानंतर गावकरी मंडळींनी सहाय्यक अभियंता व यंत्र चालक यांच्यावर कारवाईची मागणी केली तर याप्रकरणात साळुंखे यांच्या घरच्यांना तात्काळ मदतीची मागणी करु लागले त्यावेळी नागरीकांना शांत केले व मृत शरीर शवविच्छेदनासाठी आणले आहे. त्यानंतर सचिन चा भाऊ संतोष साळुंखे रा. सातोली यांनी फिर्याद दिली त्यावरुन या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.