Uncategorizedकरमाळासोलापूर जिल्हा

वीज कपात संदर्भात बाजु मांडणारे निवेदन द्यायला मात्र गैरहजर ; पालकमंत्र्यांसह आ. शिंदे उपस्थित

करमाळा समाचार 

आज मुंबई येथे जिल्हाचे पालकंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे, करमाळा तालुक्याचे आ.संजय मामा शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.संतोष सुळे यांनी राज्याचे उर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांना ना.दत्तामामा भरणे यांच्या लेटरपॅड वरून निवेदन दिले.
जिल्हातील इतर लोकप्रतिनिधी यांनी या वेळेस उपस्थित राहणे आवश्यक होते परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन थकित वीज बिलामुळे सोडवू नये,हा विषय दिनांक 25 ऑक्टोबर च्या सोलापूर येथील जिल्हानियोजन बैठकीत जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी उचलून धरला होता .त्यावेळेस स्वतः पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी सभागृहात ठराव करून जिल्ह्यातील सर्व आमदारांनी उर्जामंत्री ना.नितीन राऊत यांना भेटून निवेदन देण्याचे सभागृहात सर्वानुमते ठरले होते .

ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विहित मुदतीत वीज देयके भरणा करता आली नाहीत. आता ऊस गळीत हंगाम सुरू होणार असून त्यामधून शेतकऱ्यांना विज देयके अदा करणे शक्य होणार आहे. याबाबत सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून वीज देयके टप्प्याटप्प्याने भरण्याकरिता सवलत देण्याची विनंती केली आहे.

तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करून त्यांना थकित विज देयके टप्प्याटप्प्याने भरण्याकरिता सवलत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE