करमाळ्याचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा नगरचे महानगरपालिका आयुक्त जावळे यांचे whatsapp चे फेक अकौंट
करमाळा समाचार
अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे नावे फेक व्हाट्सएप अकाउंट आर्थिक फसवणूक होण्यापासून सावधान
अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे नावे फेक व्हाट्सएप अकाउंट कोणी अज्ञात व्यक्तीने सुरू केले आहे.

यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा फोटो वापरला आहे. या द्वारे डॉ. पंकज जावळे यांच्या परिचित व्यक्ती, मित्र परिवार, कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांना मेसेज द्वारे पैश्याची मागणी केली जात आहे. तरी या फेक मेसेजला कोणीही प्रतिसाद देऊ नये किंवा आर्थिक व्यवहार करू नये आपली आर्थिक फसवणूक होण्यापासून सावधान व सतर्क राहावे , असे आवाहन अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

+998939811860 या नंबर वरून आर्थिक मागणी होत आहे. याप्रकारच्या फसवणुकीत विदेशी नंबर असतात यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी. सुरवातीला या फेक नंबर द्वारे आस्थेवाईकपणे विचारपूस केली जाते नंतर आर्थिक मागणी केली जाते.तरी या नंबर पासून सर्वांनी सतर्क राहावे. व फेक कॉल,मेसेज,फेसबुक, ट्विटर द्वारे आर्थिक मागणीला बळी पडू नये व सतर्क राहावे.आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचे 9422084677, 9422962144 हे अधिकृत मोबाईल नंबर आहेत या व्यतिरिक्त दुसरे नंबर नाहीत.