करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

उसतोडणी मजुरांकडुन ९ लाखांची फसवणुक ; वीट, पोथरे, कर्जत येथील मजुरांवर गुन्हे दाखल

करमाळा समाचार

ऊस तोडणी साठी मजुरांना नऊ लाख रुपये रक्कम देऊनही ते ऊस तोडणीसाठी आले नसल्याने सहा जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२२-२३ या ऊस गळित हंगामासाठी २७ जून २२ ते २८ मार्च २३ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी गणेश अर्जुन जगदाळे( वय ३८) रा. हिसरे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय सुखदेव शिंदे रा. अहमदनगर, अनिल राजू मोरे रा. पोथरे ता. करमाळा, गोपीनाथ बन्सी मोरे रा. सोनारवाडी ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर, संतोष गोरख पवार , अक्षय गोरख पवार दोघे रा. वीट ता. करमाळा, विजय गुलाब बरडे रा. कर्जत जिल्हा अहमदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या उस तोडणी मजुरांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहीती अशी की, गणेश जगदाळे हे करमाळा तालुक्यातील ऊस कारखान्यास ऊस वाहतूक करण्याचे काम करतात. २०२२ – २३ या गळीत हंगामासाठी त्यांनी मकाई सहकारी साखर कारखाना यांच्यासोबत ऊस वाहकतुकीचा करार केला होता. त्यानिमित्ताने त्यांनी ऊस तोडणी मजूर शोधण्यास सुरुवात केली. यादरम्यान संबंधित सहा लोक त्यांच्या संपर्कात आले. त्यांच्यासोबत त्यांनी वेळोवेळी करार करून प्रत्येकी दीड लाख रुपये दिले आहेत. त्यांच्यासोबत जोड्या घेऊन येण्याचे ठरले होते.

याबाबत त्यांनी लेखी स्वरूपाचा करारही केला होता. सदरचे करार २७ जून २०२२ ते २८ मार्च २०२३ पर्यंत सर्व करार केले होते. त्यांनी यावेळी ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याची हमी व विश्वास दिला होता. तर आजतागायत ऊस तोडणी मजूर कामावर आले नाहीत. गावाकडे आल्यास तुझे काही खरे नाही असे म्हणून बरडे यांनी धमकीही दिली. या प्रकरणाची माहिती करमाळा पोलिसात दिल्यानंतर संबंधित सहा जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हवालदार मारुती रणदिवे हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE