करमाळा वनविभागाच्या हद्दीत मोराची शिकार करुन नेत असताना तीघे ताब्यात एक फरार
प्रतिनिधी करमाळा
कोंढेज तालुका करमाळा येथे एका मोराची शिकार करून पळून जाताना तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. सदरच्या लोकांची माहिती ही गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मोर, हरिण, ससा अशा प्रकारच्या प्राण्यांची कायमच कत्तल होत असते. परंतु संबंधितांना पकडण्यात मात्र येत नाही. परंतु आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येथील नागरिकांना एक मोर मारल्याचे लक्षात आले. तर काही लोक हा मोर घेऊन जात असतानाचे समजल्यानंतर गावकऱ्यांनी संबंधितांना रोखून ठेवले व करमाळा पोलीस ठाणेत याबाबतची माहिती दिली.
त्यावेळी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी गेले. यावेळी त्यांच्याकडे मयत लांडोर मिळून आला आहे. तर एक जण त्यातील फार झाला आहे. यावेळी दोन महिला व एक पुरुष पोलिसांच्या ताब्यात कोंढेज ग्रामस्थांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीप्रमाणे पुढील कारवाई केली जाणार आहे. संबंधिताने अद्याप आपले गाव व नाव न सांगितल्याने नेमके ते कुठून आले आहेत ही माहिती मिळाली नाही.