करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

511 ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्र कार्यक्रम ; करमाळा तालुक्यात दोन ठिकाणी

सोलापूर

ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक व युवतींना स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतीमध्ये “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्र” कार्यक्रम सुरु करण्याबाबत घोषणा केली आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्रामधून निवड करण्यात आलेल्या सर्व 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्राचे गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते व राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार व कॅबिनेट मंत्री मा.श्री.मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते वर्चुअल / ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्र” मध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छूक उमेद्वारांना मोफत प्रशिक्षण देणार येणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्रामध्ये 10 वी, 12 वी, पदवी, डिप्लोमा धारक यांना प्रशिक्षण मिळणार आहे.

सोलापुर जिल्हायातील 24 ठिकाणी सदरचे ग्रामीण प्रशिक्षण केंद्र हे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे अक्कलकोट तालुक्यामध्ये नागणसूर, जेऊर, बार्शी तालुक्यामध्ये पांगरी, मळेगांव, करमाळा तालुक्यामध्ये जेऊर, वांगी, माढा तालुक्यामध्ये टेंभूर्णी, मोडनिंब, माळशिरस तालुक्यामध्ये यशवंतनगर, माळीनगर, खंडाळी, मंगळवेढा तालुक्यामध्ये संत दामाजीनगर, भोसे, मोहोळ तालुक्यामध्ये कुरूल, पेनूर, पंढरपुर तालुक्यामध्ये करकंब, कासेगांव, टाकळी (ल), सांगोला तालुक्यामध्ये महूद बु, कोळा, उत्तर सोलापुर तालुक्यामध्ये नानज, दारफळ (बीबी), दक्षिण सोलापुर तालुक्यामध्ये कुंभारी, मंद्रुप अशा विविध ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

याअनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्र”चे गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते वर्चुअल / ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. सोलापुर जिल्हयातील सर्व महाविद्यालय तसेच शासकीय / खाजगी ITI तील सर्व विद्यार्थी यांनी तसेच त्या त्या तालुक्यातील नजीकच्या प्रशिक्षण केंद्रावर गावातील नागरिकांनी मोठया संख्येने कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहावे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE