लाडकी बहिण योजनेत मोठा बदल ; उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची घोषणा
करमाळा समाचार
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत आज १ जुलैपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पण १५ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु योजनेतील अनेक दस्तावेजांची पूर्तता दिलेल्या कालावधीत होणे शक्य नव्हते या शिवाय जन्म प्रमाणपत्र, अर्ज भरण्याचा कमी कालावधी, वयाच्या अटीमुळे अनेक महिलांना मनस्ताप तर सहन करावा लागत होता. तसेच या योजने पासुन मुकावे लागु शकत होते. त्यामुळे योजनेच्या अटीमध्ये बदल करण्यात आला आहे.

आता जन्मप्रमाणपत्र किंवा अधिवास ऐवजी पंधरा वर्षापुर्वीचे रेशनकार्ड/ मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला/ जन्मदाखला चालणार आहे. पाच एकर शेतीची अटही वगळण्यात आली आहे. वयोगटातही बदल केला आहे. यापुर्वी २१ ते ६० होता आता २१ ते ६५ करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यात सुट दिली आहे. कुटुंबातील एकमात्र अविवाहीत महिलेला लाभ दिला जाणार आहे याशिवाय मुदतही वाढवण्यात आली आहे. आता ३१ ऑगस्ट पर्यत अर्ज स्वीकारले जातील जे अर्ज करतील त्यांना १५ जुलै पासुन योजना लागु केली जाईल.

यापूर्वी कागदपत्रांमुळे वैतागलेल्या महिलांना मनस्ताप सहन करावा लागत होता. परंतु यासंदर्भात तक्रारींचा पाढा समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात सदरची घोषणा करून सर्व महिलांना दिलासा दिला आहे. उत्पन्नाचा दाखला व अविवाहित महिलांसह ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नाही त्यांना याचा लाभ होऊ शकतो.