कोरोनाकाळात दिग्विजय बागल यांच्या रुपाने आशेचा किरण ; जिल्हाधिकाऱ्यांना मागीतली परवानगी
करमाळा समाचार
सर्वत्र कोरोना केअर व बेडची मारामारी सुरू असताना आता करमाळ्यात मात्र मकाई अध्यक्ष शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या रूपाने आशेचा किरण दिसू लागला आहे. सर्वात आधी 50 बेड चे कोविड केअर सेंटर चालवण्यासाठी आमची संस्था काम करेल आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी बागल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

प्रत्येक जण प्रशासनाकडे किंवा शासनाकडे या ना त्या कारणाने नुसत्या मागण्या करताना दिसत आहे. परंतु स्वतःहून पुढे येऊन कोण काम करताना दिसत नाही. पण आता दिग्विजय बागल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे इतरांनाही जाग येईल व आपापल्या भागात काम करताना दिसून येतील.

बागल यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून दररोज तालुक्यात कोरोनाचे पेशंट वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केअर सेंटर ची आवश्यकता आहे. आमची स्व. दिगंबरराव बागल प्रतिष्ठान ही संस्था समाजोपयोगी कार्य करीत असून आमचे संस्थेच्या वतीने करमाळा तालुक्यातील मौजे मांगी येथे प्रगती विद्यालयात 50 बेडचे केअर सेंटर उभा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.