जरांगे पाटलांची एक टीम करमाळ्यात ; प्रा. झोळ यांना पाठिंबा जाहीर ! – झोळ यांची माहीती
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याच्या राजकारणात नवा वळण आले असून जरांगे पाटील यांनी करमाळ्यातील अपक्ष उमेदवार रामदास झोळ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्वतः झोळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. तर काल एक टीम करमाळ्यात येऊन सदरचा पाठिंबा दिल्याची माहिती झोळ यांनी दिली.
मुळातच सोलापूर जिल्ह्यात केवळ करमाळा तालुक्याला उमेदवार दिल्या नंतर अचानक दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करणार नाही असे जाहीर केले होते व ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांना माघार घेण्यासाठी सांगितले होते. पण आज पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी टीम पाठवून नवा धक्का करमाळा तालुक्यात दिला आहे.
यावेळी मी अपक्ष असल्याने मला पाठिंबा जाहीर केला असल्याचे झोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे तालुक्यात आता करमाळ्यासह छत्तीस गावात वेगळी कलाटणी मिळून नेमका याचा कोणाला फटका कोणाला व फायदा कोणाला होईल हे येणारा काळ ठरवेल.