करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा शहराच्या राजकारणात भुकंप ; तीन नगरसेवक जगताप गटाकडे ?

करमाळा समाचार 

 

बागल गटाचे तीन नगरसेवकांनी नुकतेच एक पत्र प्रसिद्ध मुख्याधिकारी विना पवार तसेच नगरसेवक वैभव राजे जगताप यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. तर काही दिवसांपूर्वी नगरसेवक सचिन घोलप यांनी जगताप यांच्या कामाला नावं ठेवली होती. पण या तीन नगरसेवकांनी केलेली स्तुती हा बागल गटाला धक्का मानला जात आहे. तर हे तीनही नगरसेवक जगताप गटाच्या बाजूने झुकले तर नाहीत ना असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. जर तसे असेल तर बागल गटाला हा मोठा धक्का असणार आहे.

असे पत्र लिहुन कौतुक केले आहे. 

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातलेला असताना देखिल करमाळा नगर परिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी विणा पवार अन् नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज करुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.करमाळा नगर परिषद ‘क’ वर्ग नगर परिषद असताना देखील वर्षभरात जवळपास वीस कोटी निधी शासन दरबारी राजकिय वजन वापरून शहरवासियांसाठी खेचून आणला आहे. संपूर्ण शहरातील रस्ते पक्के अन् मजबुत झाले आहेत. शहरातील संगम चौकातील सिंमेट काँक्रिट रस्ता, महावीर उदयान,सात विहीर परिसर, नाना -नानी पार्क, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून झालेली ६५ एकरामध्ये केलेली २५ हजार वृक्ष लागवड, शेकडो व्यापारी गाळे, भाजी मंडई, १६० अत्याधुनिक शौचालये, ओपन जीम, अपंगासाठी निधी वाटप व अशी एक ना अनेक विधायक कामे शहरात झाली आहेत. मुख्याधिकारी विणा पवार मॅडम ची तर लहान-लहान मुलं असताना देखील तसेच नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांना स्वतःला कोरोना झाला असताना देखील शहरामध्ये शहरवासियांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालुन काम केले आहे.कोरोना टेस्टींग,कोवीड सेंटरचे नियोजन अन् लसीकरणाचे नियोजनही उत्कृष्टपणे हाताळले आहे.शहरातील झालेल्या विधायक कामांना विरोधीपक्ष नेता म्हणून विरोध करण्यासाठी जागाच उरली नाही. . याचा आपल्याला अभिमान आहे. शहराची वाटचाल स्मार्ट अन् आदर्श शहराच्या दिशेने होत आहे. मुख्याधिकारी विणा पवार मॅडम यांची उत्कृष्ट प्रशासकिय अंमलबजावणी अन् नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांची दुरदृष्टी यामुळे शहराचा चेहरा -मोहराच बदलला आहे. चांगल्या कामांना नावं न ठेवता त्याचं कौतुकच केलं पाहीजे असे स्पष्ट मत व्यक्त करत नगर परिषदेचे विरोधी पक्षनेता श्रीनिवास कांबळे, नगरसेविका राजश्री माने व नगरसेविका प्रमिला कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कौतुक केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE