करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पंधरा ग्रामपंचायती मध्ये एकुण ७९ टक्के मतदान ; गावनिहाय आकडेवारी

करमाळा समाचार

तालुक्यातील १५ ग्रामपंचायत मतदार संघात शांततेत मतदान पार पडले. काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडत असताना प्रशासनाने संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था ठेवल्याने कोणत्याही अनुचित घटना दिसून आल्या नाहीत. तर एकूण ४९ हजार ९५० मतदारांपैकी ३९ हजार ८०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. संपुर्ण पंधरा ग्रामपंचायतीची ७९. ७० टक्के मतदान नोंदवण्यात आले. निरिक्षक म्हणून तहसिलदार विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले तर पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

(करमाळा समाचार – विशाल घोलप) कावळवाडी ७८७ पैकी ७२५, रामवाडी ९७२ पैकी ८८०, भगतवाडी ११६४ पैकी १०७८, जेऊर ५०२७ पैकी ३५५१, चिखलठाण ४३२४ पैकी ३३७४, राजुरी २७३६ पैकी २३९५, केतुर ३४८१,पैकी २४०१, गौडरे १८६२ पैकी १६४०, कंदर ४८०३ पैकी ३८८३, केम ७४९४ पैकी ५५८४, कोर्टी ४२२५ पैकी ३४४८, वीट ४३८१ पैकी ३७१२, निंभोरे २४४१ पैकी २०३३, घोटी २७०१ पैकी २२०६ व रावगाव येथे ३५५२ पैकी २८९८ इतके मतदान झाले आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE