करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गोठ्यात जनावरांचा आवाज आल्यावर दरवाजा उघडला ; चौघांनी घरात घुसुन जबरदस्तीने लुटले

करमाळा समाचार

 

सालसे येथील राहत्या घरात अनोळखी चार व्यक्तींनी सशस्त्र हल्ला करुन घरातील एका लाखांच्या मुद्देमाल घेऊन पसार झाले आहेत. सदरची घटना सालसे ता. करमाळा येथे शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी झालेल्या मारहाणीत आडसुळ दांपत्याला मारहाण करुन जखमी केले आहे. याप्रकरणी मधुकर संतराम आडसुळ, वय ६५ वर्षे, रा. सरकारी विहीरीजवळ, सालसे, ता. करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी किंवा, घरासमोर असलेल्या गोठयातील गाय ओरडल्याचा आवाज आल्याने मधुकर यांनी घराचा दरवाजा उघडला त्यावेळी अचानकपणे २० ते ३० वर्षे वयाचे ४ अनोळखी व्यक्तींनी घरामध्ये जबरदस्तीने घुसुन फिर्यादीच्या घरातील पेटया व डबे उघडण्यास सुरूवात केली. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. म्हणुन त्यांच्यापैकी एकाने मधुकर यांच्या डावे हाताचे पंजावर चाकुने वार करुन जखमी केले.

त्यांच्यापैकी एकाने काठीने फिर्यादीचे उजवे पायावर, पाठीवर व खांद्यावर मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी मधुकर यांचा ओरडल्याने त्यांची पत्नी सोडवण्यासाठी आली असता त्यांनी तीच्याही पाठीवर काठीने मारहान केली यावेळे घरातील

१५ हजार रोख रक्कम, १५ ग्रॅम वजनाचे सोन्याची गंठण, ९ हजार रुपयांचे २ गॅम वजनाचे मंगळसुत्र ९ हजाराची सोन्याची फुले, ३ हजाराचे तीन फोन असा एकुण १ लाख ३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढुन घेवुन गेले आहेत अशी फिर्याद मधुकर अडसुळ यांनी दिली आहेसदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE