महिलेला चाकु व कोयत्याचा धाक ; यात्रे दिवशी मध्यरात्री तीन घरात चोरी
समाचार टीम
तालुक्यातील अंजनडोह गावातील धनदेवी यात्रेचा पालखीचा कार्यक्रम असल्याने गावकरी त्यात व्यस्त असल्याचा फायदा उचलुन चोरी करण्यासाठी आलेल्या दोघांनी तीन घरातुन जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल लांबवला आहे. यावेळी त्यांनी एका घरात महिलेला चाकु आणी कोयत्याचा धाक दाख ऊन तर दुसऱ्या दोन घरातील बंद घरातील मुद्देमाल चोरुन नेला आहे. सदरची घटना (दि ६) मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी महादेव आत्माराम मेढे (वय ४९), सुनिल रामदास मासाळ (वय ३२) व रामदास गोरख सोनवणे रा. अंजनडोह ता. करमाळा यांच्या घरी चोऱ्या झाल्या आहेत. तर दोन अनोळखी व्यक्तींवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी मेढे यांच्या कडील ५२ हजारांचा, मासाळ यांच्याकडील ६३ हजार तर सोनवणे यांचा अंदाजे ५० हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, अंजनडोह गावात धनदेवीचा पालखीचा उत्सव गावातील सर्व गावकरी सहकुटुंब सह परिवार साजारा करत होते. रात्री उशीरा बाराच्या सुमारास यातील फिर्यादी महादेव मेंढे यांची पत्नी घरी आली यावेळी तीच्या सोबत मुलगी पण होती. ती महिला स्वयंपाक करु लागली. यावेळी दोन अज्ञात व्यक्तीनी घरात प्रवेश केला व चाकु आणी कोयत्याचा धाक दाखवत अंगावरील व घरातील ऐवज काढुन देण्यासाठी दबाव टाकला यावेळी एक पाऊन तोळ्याचे गंठण तीस हजार, चांदीचे पैजन जोडी दोन हजार व अर्धा तोळे वजनाची कानातील फुले वीस हजार असे ५२ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला व स्वयंपाक खोलीला बाहेरुन कडी लाऊन निघुन गेले.
तर इतर दोन घरे यात्रे मुळे बंद होते. त्यातील मासाळ यांच्या घरातील एक तोळे वजनाचे गंठण तीस हजार, अर्धा तोळ्याची उसी १५ हजार, अर्धा तोळ्याचे कानातील झुबे व तीन हजाराच्या साड्या शालु अशा महागड्या वस्तु एकुण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. यादरम्यान सोनवणे यांच्या घराचा कुलुप तोडुन आत प्रवेश करुन पन्नास हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली व तपास सुरु केला आहे.