करमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यात पावसाचा धुमाकुळ – आठ मंडळात एकुण 445 mm नोंद ; घोटीच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा प्रशासनाला विसर

समाचार टीम

घोटीतील पाणी अडवल्याने अडचणी

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री मोठा पाऊस झाल्याने तालुक्यात सर्व दूर पाणीच पाणी झाले आहे. रात्री झालेल्या पावसात करमाळा शहरात 55 मिलिमीटर पावसाची नोंद तर अर्जुन नगर परिसरात सर्वाधिक 90 मिलिमीटर पावसाळी नोंद झाली आहे. आठ मंडळातील बेरीज केली तर एकाच रात्री तब्बल 445 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आली आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले.

यानिमित्ताने घोटी येथील शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यात सर्व ठिकाणी पाऊसच पाऊस झाला असून शेतीत पाणी असणे साहजिक आहे. परंतु घोटी येथील काही शेतकऱ्यांच्या आडमुठी भूमिकेमुळे रस्त्याच्या कडेची चारी मध्येच बंद पडल्याने त्या ठिकाणी वाहणारे पाणी सर्व आसपासच्या शेतांमध्ये घुसत आहे व त्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

काल रात्री झालेल्या पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले असून घोटी ते वरकुटे जाणाऱ्या रस्त्यावरील चारीतून पाणी पुढे न गेल्यामुळे हेच पाणी आता नागरिकांच्या घरा खालून निघु लागले आहे. त्यामुळे घरालाही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील महिन्यात बांधकाम विभाग यांच्यावतीने उपोषणाला बसलेल्या लोकांना पंधरा दिवसात चारी खुली करू असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप ते पाणी पुढे जाण्यासाठी वाट न करून दिल्याने आता शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होणार आहे. याची जबाबदारी आता प्रशासन घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

तालुक्यातील आठ मंडळांमध्ये अशा पद्धतीने पावसाची नोंद करण्यात आली आहे…
Karmala 55 mm
KORTI 36 mm
Kem 85 mm
Kettur 76 mm
Jeur 25 mm
Salse 59 mm
Umrad 19mm
Arjunnagar 90 mm
Total rainfall 445 mm

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE