करमाळासोलापूर जिल्हा

पठारावर चढाई करण्यासाठी गेल्यानंतर उमरड येथील एका युवकाचा मृत्यु ; बारामती येथील विद्यार्थी गेले होते ट्रेकिंगला

समाचार टीम

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका पठारावर ट्रेकिंग करण्यासाठी गेल्यानंतर करमाळा तालुक्यातील उमरड येथील शुभम चोपडे याचा हृदयविकाराच्या त्रासाने मृत्यू झाला आहे. शुभम हा बारामती येथील शारदा विद्यालयात शिक्षण घेत होता. सदरचा प्रकार आज सकाळी घडला आहे. करमाळा तालुक्यात शुभमची बातमी कळताच हळहळ व्यक्त होत आहे.

यासंदर्भात प्राथमिक माहिती अशी की, बारामती येथील शाळेचे विद्यार्थी रायरेश्वर येथील पठारावर ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी चढाई  करण्यासाठी गेलेल्या शुभम चोपडे याला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. त्याला परिसरातील दवाखान्यात घेण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सदरचा प्रकार आज सकाळी नऊच्या सुमारास घडला असून त्यांच्या मृत शरीर हे करमाळा तालुक्यातील उमरड येथे आणण्यात आले आहे. परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुभम अवघ्या अठरा वर्षाचा मुलगा असल्याने त्याच्या अचानक जाण्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE