करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वैद्यकीय अधिकारी पुंडे यांच्यावर चाकुने हल्ला ; महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार

येथील तालुका वैद्यकीय अधिकारी पदी नुकतेच प्रभारी पदभार घेतलेल्या डॉ रवींद्र पुंडे (वय ५३) यांना गावातील तिघांनी जीवघेणा हल्ला करून मारहाण केली आहे. याप्रकरणी एक महिला व तिच्या दोन मुलांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास साडे येथे घडला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, डॉ.रवींद्र पुंडे हे साडे येथील रहिवासी असून साडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नुकताच त्यांना करमाळा तालुका वैद्यकीय अधिकारी पदभार मिळालेला आहे. ते गावातील असल्यामुळे त्यांची व गायकवाड कुटुंबीयांची चांगली ओळख आहे.

गायकवाड यांनी वैयक्तिक ओळखीतून आपल्याकडे पैशाची मागणी केली होती व आपण ती देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून सदरची मारहाण करण्यात आल्याचे डॉ. पुंडे यांनी पोलिसांना सांगितले.

साडे येथील बस स्थानकाजवळ एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास किरण गायकवाड, संगीता (फरतडे) गायकवाड, तेजस गायकवाड हे तिघे तिथे आले व पुंडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी किरणच्या हातातील छोट्या सुरीने डॉ. पुंडे यांना मारल्याने गंभीर जखम झाली आहे.

यावेळी उपस्थित स्थानिक लोकांनी सदरचे भांडण सोडवले व डॉ. पुंडे यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे तपास करीत असून त्यांनी प्रकरणातील दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE