करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पोथऱ्यात अनोखा उपक्रम – कृतज्ञता म्हणुन दिडशे मातापितांची शोभायात्रा

प्रतिनिधी| करमाळा


तालुक्यातील पोथरे येथील हनुमान भजनी मंडळाने आई-वडिलांविषयी एक अनोखा उपक्रम राबवत गावातील १५० कुटुंबातील ३०० आई-वडीलांचा गावातून रथात बसवून त्यांची मिरवणूक काढून पाद्य पूजा केली आहे. या शोभायात्रेमध्ये गावातील हजारो नागरिकांनी सहभागी होत आई वडिलांविषयी कृतज्ञ त्या व्यक्त केली आहे.

पोथरे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात १५० जोड्यांचा भव्य सामूहिक मिरवणूक काढून पाद्यपूजनाचा कार्यक्रम राबवला आहे. यामध्ये १५० कुटुंबातील ३०० आई-वडिलांची पारंपारिक वाद्याच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सायंकाळी सात वाजता भैरवनाथ मंदिरापाशी आई-वडिलांना खुर्चीवर बसून त्यांच्या मुलांकडून त्यांची पाद्यपूजा करून त्यांना तीन प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. यावेळी ॲड. बाबुराव महाराज हिरडे, प्रा. आजिनाथ झिंजाडे, पोलीस पाटील संदिप शिंदे, ॲड. नानासाहेब शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे, हरीश कडू, प्रशांत ढवळे, नाना पठाडे यांनी आई-वडिलांच्या ऋणाविषयी विचार व्यक्त केले.

आई-वडिलांच्या निधनानंतरचा विधी मोठ्या थाटात करण्यापेक्षा जिवंतपणे त्यांना हा आनंद द्यायचा या हेतूने त्यांची मिरवणूक काढून पाद्य पूजा केली. दिवसभर आम्ही फक्त आई-वडिलांची सेवा केली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्रेम हे शब्दात न सांगण्याजोगे होते.
– मृदंगाचार्य नाना पठाडे पोथरे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE