करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिवसेना कार्यकारिणी बरखास्त; नव्या नियुक्त्या लवकरच

करमाळा (प्रतिनिधी) –

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर लवकरच सर्व विभागीय संपर्कप्रमुख, सह-संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखतींनंतर शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदांपर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.

दरम्यान, विशेष मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेत सर्व शिवसैनिकांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत चांगली कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंद घेऊन त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना पदे दिली जाणार आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE