पोलिस ठाण्याच्या आवारात फिरल्यामुळे एकावर कारवाई ; न्यायालयाने ठोठावला दंड
करमाळा समाचार
करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात विनाकारण फिरणाऱ्यावर करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 120 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पंधराशे रुपये दंड ठोठावला आहे.

सोमवारी नेहमीप्रमाणे तहसील आवार तसेच पोलिस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यावेळी केत्तुर क्रमांक एक येथील गोरख उर्फ हनुमंत गावडे यांनी कोणतेही लेखी स्वरूपात परवानगी न घेता कस्टडी जवळ आरोपीस भेटण्यासाठी जात होते. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासमोर उभे केले.

विनापरवाना तसेच पोलिसांची परवानगी न घेता पोलिस कस्टडी शेजारी फिरत असल्याचे आढळल्याने संबंधित व्यक्तीस जाब विचारला. परंतु त्याकडे योग्य उत्तर मिळून आल्याने अखेर त्याच्यावर कलम 120 प्रमाणे खटला पाठवण्यात आला. त्यामुळे कोणत्याही आरोपीस भेटण्यासाठी जाण्याआधी कायदेशीर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारच्या दंडाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.