करमाळ्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई ; करमाळा पोलिसांची कारवाई
करमाळा समाचार
करमाळा शहरात जीन मैदानासमोर खाजग गाळ्यामध्ये कमलाई क्लिनिक नावाने दवाखाना चालवत असलेल्या निखिल विश्वास (वय 68) रा. महिंद्रनगर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवाना नसताना दवाखाना चालू केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे, सहाय्यक पोलिस निरिक्षक एम एन जगदाळे व वैद्यकीय अधिक्षक गजानन गुंजकर यांच्या पथकाने केली आहे.

करमाळा शहरात बऱ्याच दिवसांपासून निखिल विश्वास यांचा दवाखाना जिन मैदानासमोर खाजगी गाळ्यात सुरू होता. स्वतःला ते डॉक्टर असल्याचे बताणी करत होते. तर त्यांच्याकडे प्रिस्क्रिशन पॅड त्यावर डॉ. महाजन यांची नावे टाकून पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या नावाखाली दवाखाना चालून जनतेची फसवणूक केली. त्यावरून संबंधित डॉक्टरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या क्लिनिकमध्ये मुळव्याध, भगंदर व त्वचेच्या रोगास संदर्भात औषधे दिली जात होती. त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीचे गोळ्या जप्त करण्यात आले आहेत. सदरची कारवाई शासकीय दवाखाना तसेच करमाळा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.