मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाचरणी साकडे ; वर्ध्याच्या दांपत्याला मानकरी म्हणुन मान
करमाळा समाचार – पंढरपूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी कोरोनाचं संकट नष्ट होऊ दे असं साकडं घातलं आहे. तर मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते (जिल्हा वर्धा) इंदुबाई केशव कोलते यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून मानाचे वारकरी म्हणून एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, मंदीर समीतीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते आदि उपस्थित होते.

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातलं.
Chief Minister’s Pandurangacharani Sakade; Respect the Wardha couple as Manakari