जैन समाजाचा अपप्रचार करणाऱ्या मंडळावर कारवाई करावी
जामखेड प्रतिनिधी
अतिरेकी हल्ले , कोरोणा, दुष्काळ, पूर , भूकंप अशी मानव नैसर्गिक संकटे जैन समाजामुळे येतात, जैन लोक काळी जादू करतात असा अपप्रचार महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश राजस्थान सह देशभरात करून समाज विघातक कारवाया करणार्या राजस्थानमधील अनुप मंडळ करीत आहे, म्हणून या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस चतुर्थ झोन दिल्ली यांचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी केली आहे.

ही संघटना कोण चालवते तिला अर्थसहाय्य व राजकीय संरक्षण कोण देते याची सी बी आय मार्फत चौकशी करून तातडीने ठोस कारवाई करावी आणि सोशल मीडियावरील अकाउंट बंद करावेत अशी मागणी केली आहे अशा प्रकारचे निवेदन जामखेड येथील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे संजय कोठारी यांच्यासमवेत प्रफुल्ल सोळंकी , गणेश भळगट, अमोल तातेड, आनील फिरोदिया आदींनी केली आहे अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या जैन समाजाविरुद्ध अनुप मंडळ च्या कारवाया सुरू आहेत लोकांना भडकावून अहिंसेचा विरोध करणाऱ्या या संघटनेने विरुद्ध राजस्थानात गुन्हे दाखल झाले आहेत न्यायालयानेही कारवाई आदेश दिले आहेत असे या निवेदनात म्हटले आहे
