E-Paperकरमाळापंढरपूरसोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या आंदोलनाला वंचीतचा पाठिंबा – चंदनशिवे ; हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा दत्तमंदिर येथे तालुकाध्यक्ष सुभाष ओव्होळ ‌याच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी वचिंतचे जिल्हा निरीक्षक बबन शिंदे वंचितचे आप्पा‌ बनसुडे, वंचितचे जिल्हा नेते नाना कदम, वंचित आघाडीचे शहरध्यक्ष विशाल लोंढे, गेदा कांबळे, शिवाजी भोसले, सायबा वाघमारे, लहु भालेराव , लक्ष्मण भोसले, दास भोसले, अनिल भालेराव, अतुल गजरमल , सुनिल शिंदे, राहुल गरड, केरबा जगदाळे, ह.ब.प आण्णा सुपनर, ह.ब.प अभंग महाराज, दत्ता गुरव भुंजग मुटके, महेश घरबुडे, अमोल पोळके, प्रशांत ओव्होळ, तुळशीराम ओव्होळ उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनशी मार्गदर्शन करताना आनंद चंदनशिवे म्हणाले, कोरोनाच्या काळात महाराष्ट्रामध्ये लाॅकडाऊन जाहीर झाल्यापासून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर प्रवेश बंद आहे. या पार्श्वभूमीवर 31आॅगस्ट रोजी पंढरपूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. बंद असलेले मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात यावे अशी मागणी वारकरी मंडळाने केली आहे. म्हणून 31 आॅगस्ट रोजी वारकरी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहुन पाठिंबा देणार आहेत. त्यासाठी करमाळा तालुक्यातून ‌जास्ती जास्त वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे सांगितले यावेळी सर्व वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE