आबांच्या शिवसेनेत केलेल्या कामांमुळे लोकसभेलाही भगवा फडकणार
करमाळा – विशाल घोलप
माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील पंचवार्षीक मध्ये केलेली कामे आजही ठरकपणे दिसत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. तरीही कोणीही गाफिल न राहता १०० टक्के सक्रिय व सावध राहिले पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते पंचायत समीतीचे माजी सभापती अतुल पाटील यांनी केले आहे.
ते करमाळा येथे आयोजीत शिव संकल्प अभियान व शिवसैनिक मेळावा दरम्यान ते बोलत होते. सदरचा कार्यक्रम हा अथर्व मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा प्रमुख सोलापूर शिवाजीराव सावंत हे उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आम्हाला कोणावर टिका करायची नाही पण नारायण आबांच्या काळात केलेल्या कामाच्या जोरावर शिवसेनेचाच झेंडा लागणार आहे. ज्या पद्धतीने कोणताच पैलवान विजयी जाहीर होत नाही तो पर्यत समाधान मानत नाही तसाच आपण जो पर्यत शिवसेनेचा भगवा फडकत नाही तो पर्यत शांत बसु नका ज्याला जी जबाबदारी मिळेल ती पार पाडा.
भैरवनाथचे किरण सावंत, शिवसेनेचे अरविंद पवार शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, ता. संपर्क प्रमुख रविंद्र आमले, तालुकाध्यक्ष देवानंद बागल, महिला नेत्या प्रियंका गायकवाड, माजी सभापती शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, बिभिषण आवटे , विशाल गायकवाड, सागर गायकवाड, निखील चांदगुडे, नागेश काळे आदिसह शिवसैनिक उपस्थित आहेत.