शाळेप्रती कृतज्ञता दाखवत माजी विद्यार्थीनीचे कौतुकास्पद काम
करमाळा समाचार
सरकारी नोकरी आणि नोकरीतला पगार सुरु झाला की प्रत्येक जण आपल्याच दुनियेत रमुण जातो,आपण कोण होतो, काय झालो याची जाणीव न ठेवता स्वतःच्या विश्वात रममाण होतो. आपण जसे आपल्या कुटुंबाचे देणे लागतो तसे समाजाचे देखील देणे लागतो हा विसर बर्याच जणांना पडतो ,मात्र सालसे येथील सर्व सामान्य कुटुंबातील कुमारी पुनम हरिश्चंद्र थोरे हि यास अपवाद ठरली आहे .

सालसे येथे मोटार रिवायडिंग करण्याचे काम करुन कुटुंबाची प्रगती साधणारे हरिश्चंद्र थोरे यांच्या कन्येचे दहावीपर्यंतचे शिक्षण सालसे येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात झाले .पुढील शिक्षण पुर्ण करुन पुनम हि गेल्यावर्षी इंजीनियर झाली मात्र आपण ज्या शाळेत शिकलो , जिथे आपल्या विचाराचा पाया मजबूत झाला त्या शाळेसाठी योगदान देणे आपले कर्तव्य आहे हे समजून इंजीनियर कु पुनम हरिश्चंद्र थोरे या माजी विद्यार्थ्यांनीने आपल्या पगारातुन २१ हजार रु किमतीचा इन्वर्टर शाळेसाठी भेट दिला आहे.

इंजीनियर कु पुनम हिच्या या उपक्रमाचे प्रशालेकडुन तसेच ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक होत आहे प्रशालेच्या वतिने पुनम हिचे वडील हरिश्चंद्र थोरे (तात्या) यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी संचालिका श्रीम. तनपुरे मॅडम माजी मुख्याध्यापक श्री ननवरे सर ,श्री नारायण थोरे, श्री मधुकर हांडे, श्री जालिंदर शिंदे, कु.रवीराज सालगुडे, श्री गणेश पाटील ,(पो पाटील वरकुटे) लहुराज पाटील, लहू लोकरे, भाऊसाहेब पोळ, उत्तम घाडगे, संतोष शिरसट, शिवाजी लोकरे उपस्थित होते.
आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या शाळे विषयी आपल्या मनात वेगळीच ओढ कायम असते. शाळेसाठी भेटवस्तु द्यावी या करता वडिलांसोबत शाळेत गेले होते तेव्हा विज गायब झाल्यानंतर अडचणी येत असल्याने जाणवुन आले त्यामुळे प्रशालेस इन्व्हर्टर भेट दिला आहे. एवढ्यावरच आपली जबाबदारी संपत नसुन गावातील सर्व नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप करुन गावातील जिल्हापरिषद शाळा, हायस्कुल या ठिकाणी शैक्षणिक कार्यात विद्यार्थ्यांना भरिव सहकार्य होईल असे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.
-इंजि. कु पुनम हरिश्चंद्र थोरे)