करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारल्याने वादावादी

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. याबैठकीवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आत प्रवेश दिला. पण इतर महाविकास आघाडी मधील शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे व इतर पक्षाच्या पदाधिका-यांना प्रवेश न दिल्याने थोड्या वेळापुरती वादावादी निर्माण झाली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी वाद थांबवत इतर पदाधिकाऱ्यांना ही आत सोडल्यावर थोडक्यात वाद मिटला आहे. नंतर नाराज पदाधिकाऱ्यांना आत घेण्यात आले. नंतर चिवटे यांच्यासह मनसेचे संजय घोलप, राष्ट्रवादीचे चवरे, शिवसेनेचे संजय शिंदे यांना आत सोडण्यात आले.

आज झालेल्या बैठकीमध्ये पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरत अपूर्ण कामं बाबत जाब विचारला. तर नागरिकांच्या अडचणी दूर करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी कोणत्याही नियमांची बाधा आडवी न येता सोप्या पद्धतीने सर्वांना परवानग्या द्या. त्यामध्ये कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलचा समावेश आहे. तसेच लॉकडाऊन कडक निर्बंध पाळले जावेत. यासाठी माझा जरी फोन आला तरी कोणाची घाई करू नका अशाही सूचना यावेळी पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

पत्रकारांशी संवाद साधताना ऑक्सिजन च्या अपुरा पुरवठा बाबत बोलताना, सर्वत्रच ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. तरी याच्यात लवकरच सुधारणा केली जाते. शिवाय लसीकरण व रेमडीसिवर इंजेक्शनचाही पुरवठा वाढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे पालकमंत्री भरणे यावेळी स्पष्ट केले. पण त्यांना इतर ठिकाणी जाण्याचे असल्याने पत्रकार परिषद आटोपती घेऊन पालक मंत्री निघून गेले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE