३५ पैकी चार बाद झाल्यावर एका महिलेसह करमाळ्यातील वीस तर छत्तीस गावातुन ११ उमेदवार मैदानात
करमाळा समाचार
विधानसभा मतदारसंघात आज छाननीच्या दिवशी चार अर्ज बाद झाल्यानंतर आता ३१ उमेदवार मैदानात उरले आहेत. त्यामध्ये एक महिला व ३० पुरुषांचा समावेश आहे. संपूर्ण मतदारसंघातून केवळ एक महिला उभा असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यंदा दिग्विजय बागल उभा राहिल्याने रश्मी बागल यांनी फॉर्म भरलेला दिसून आलेला नाही. तर छत्तीस गावातून ११ तर करमाळ्यातील २० उमेदवारांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
करमाळा तालुका विधानसभा मतदारसंघातून ३१ उमेदवाराचा अर्ज मंजूर तर चार अर्ज कागदपत्र अपुरी असल्याने बाद करण्यात आला आहे. त्यामध्ये काँग्रेसचे प्रताप जगताप यांचा समावेश आहे. प्रताप जगताप यांनी अपक्षच फॉर्म भरला होता पण त्यातही त्रुटी आढळल्याने तो बाद करण्यात आला. तर तालुक्यातून उभा असलेल्या उमेदवारांमध्ये सहा उमेदवार हे पक्षाच्या माध्यमातून उभा आहेत. तर इतर सर्व उमेदवार अपक्ष उभा असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये संजय मामा शिंदे यांचा ही समावेश आहे.
पक्षाच्या माध्यमातून मैदानात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे…
दिग्विजय बागल (शिवसेना शिंदे गट), नारायण पाटील (राष्ट्रवादी शप), संजय वामन शिंदे (बहुजन समाज पार्टी), अशोक वाघमोडे (न्यू रासप), विकास आलदर (रासप), शहाजान शेख (बीएचपी) असे उमेदवार पक्षाच्या माध्यमातून तर जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून असलेले प्रा. रामदास झोळ, माया झोळ, उदयसिंह देशमुख व डॉ. सुजितकुमार शिंदे असे उमेदवार आहेत.
अपक्ष मैदानात असलेले उमेदवार पुढील प्रमाणे..
संजयमामा शिंदे, सुहास ओहोळ, अतुल खूपसे, ऍड जमीर शेख, जालिंदर कांबळे, जितेंद्र गायकवाड, धीरज कोळेकर, निवृत्ती पाटील, गणेश भानवसे, मधुकर मिसाळ, बाळासाहेब वळेकर, सिद्धांत वाघमारे, विनोद दाळवाले, दत्तात्रय शिंदे, यशवंत शिंदे, संजय लिंबराज शिंदे, सागर लोकरे, संजय विठ्ठल शिंदे, संभाजी भोसले व संभाजी उबाळे असे उमेदवार अपेक्ष मैदानात आहेत. सर्व चित्र उमेदवारी माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट होईल.