माढा, मोहोळचे इनकमिंग थांबल्यानंतर खासदारनिंबाळकर व कंबोजांचे सुचक इशारे ; अजितदादा नंतर युवा नेते रोहित पवार लक्ष ?
समाचार टीम
काही दिवसांपूर्वी माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरु होती. परंतु मध्यंतरी राष्ट्रवादी नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत एक बैठक झाल्यानंतर या सर्व चर्चाना पुर्ण विराम मिळाला होता. म्हणून तेव्हापासुन शिंदे व पाटील यांचे राष्ट्रवादी सोडण्याच्या थांबल्या.

त्यानंतर माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक खासदार निंबाळकर हे माढा दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी आणखी पाच राष्ट्रवादी नेत्यांवर ईडीची कारवाईची शक्यता असल्याची एक वक्तव्य केले होते. तो एक प्रकारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा होता. त्यानंतर आता रोहित पवार हे राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व असून त्यांच्या कार्यक्षेत्रात ते प्रगती करताना दिसत आहे. तर सुरुवातीच्या काळापासून अजित पवार यांना लक्ष केलेली भाजपा आता पवार घराण्यातील युवा चेहऱ्याला लक्ष करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

नुकतेच भाजपाचे मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत बारामती ॲग्रोचा प्रगतीचा आलेख कशा पद्धतीने चढत चालला आहे. याचा अभ्यास करावा लागेल असे एक सूचक वक्तव्य केले आहे. यातून ते रोहित पवारांकडे लक्ष करत असल्याचे दिसून येते.
मागील काही दिवसांपासून भाजपने बनवलेले प्लॅन हे पूर्णत्वास जात नाहीत. शिवाय रोहित पवारांची विकासात्मक घौडदौड सुरूच आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार वेगवेगळ्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना अडचणीत आणत आहेत. तर शिवसेनेचे बरेच नेते, कार्यकर्ते हे शिंदे गटासोबत गेल्याने शिवसेना झाल्यानंतर राष्ट्रवादीतुन इनकमिंग कशी करता येईल त्यावर भाजपाचे लक्ष असु शकते. पण जे प्रवेश होताना दिसत नाहीत. त्यांना कशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा भयभीत करून आपल्या बाजूने घेता येईल यासाठी खासदार निंबाळकर व कंबोज सारखे नेते समोर येऊन त्यांना नकळत इशारे देताना दिसत आहे