करमाळासोलापूर जिल्हा

कालच्या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक उद्या बागलाविरोधात निषेधमोर्चा

करमाळा समाचार 

शनिवारी दिग्विजय बागल यांनी मकाई कार्यक्षेत्रात आंदोलन करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केली व धमकी दिली असे म्हणत त्यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी पोथरे नाका करमाळा येथून तहसील कार्यालय पर्यंत दुपारी दोन वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना दिले आहे.

शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मकाई कार्यक्षेत्रात गेलेले असताना त्याठिकाणी मकाई चे अध्यक्ष दिग्विजय बागल व कार्यकर्ते समोरासमोर भेटल्यानंतर त्या ठिकाणी बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत दिग्विजय बागल यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. या मोर्चासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे उपस्थित राहणार आहेत. तर शेकडोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी केले आहे.

याबाबत तहसीलदार समीर माने यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, तालुका पक्षाध्यक्ष बापू फरतडे, तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे, शाखा अध्यक्ष जातेगाव अशोक लवंगारे आदींच्या सह्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE