पहिल्या फेरी नंतर बागल गट आघाडीवर ; पॅनल प्रमुख प्रा. झोळ यांच्या गावातुन अल्पप्रतिसाद ?
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तरी सुरुवात झाल्यानंतर थोड्या वेळातच मतदानाचे कल हाती येण्यास सुरुवात झाली. यामध्ये बागल गटाची सरशी असल्याचे दिसून येत आहे. भिलारवाडी गटाची मतमोजणी हाती लागली. त्यावेळी जवळपास २६०० मतांचे मताधिक्य बागल गटाचे दिसून आले आहे. अद्याप दुसरी फेरी बाकी आहे. त्यानंतरच निकाल निश्चित होणार आहेत. परंतु बागल गटाने आता घेतलेली मुसंडी ही नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी आहे.

पहिल्या फेरीत हाती लागलेले निकाल सुनीता गिरंजे, यांना 843, आप्पा जाधव यांना 730 तर अजित झांजुर्णे 3434 तर रामचंद्र हाके यांना 3489 इतके मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. याची अधिकृत माहीती अद्याप हाती लागली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार सदरची आकडेवारी ही बागल गटाच्या फायद्याची असल्याची दिसून येत आहे.

तर प्रा. झोळ यांच्या मुळ गावी वाशिंबे गावातील मिळालेल्या माहितीनुसार केंद्रावर बरीचशी पीछेहाट झाल्याची दिसून येत आहे. तर विरोधी गटातील उमेदवारांना 300 च्या पुढे मतदान मिळाले आहे. तर झोळ यांच्या उमेदवारांना त्या ठिकाणी शतकापर्यंत ही पोहचता आले नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखच स्वतःच्या गावात काहीच करू शकत नसतील तर तालुक्यात कसा त्यांचा निभाव लागेल हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पुढे होणाऱ्या निकाल स्पष्ट होणार आहे. परंतु त्यात केवळ विजय कितीच्या फरकाने असेल एवढीच औपचारिकता बाकी राहिल्याचे मत मांगी गटातील उमेदवार अमोल यादव यांनी व्यक्त केले आहे.