करमाळासोलापूर जिल्हा

युवा शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर यंत्रणा खडबडुन जागी ; “या” भागात बिबट्याला पकडण्याची तयारी – आमदार शिंदेच्या सुचना

करमाळा समाचार

गुरुवारी शेती पिकाला पाणी घालण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या हल्ल्यात यूवा शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर आता वन विभाग खडबडून जागे झाले आहे. सोलापूरसह तीन जिल्ह्यांच्या पत्र दाखल झाले आहेत तर सदरच्या बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याबाबत माहिती अधिकार यांच्या वतीने देण्यात आली आहे तर काही वेळा पूर्वी मोरवड परिसरात बिबट्या आल्याची चर्चा होती तशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

मागील आठवडाभरापासून तालुक्यात बिबट्या असल्याबाबतची चर्चा होती. पण वन विभागाच्या वतीने वेगवान पावले उचलणे अपेक्षित असताना त्याठिकाणी दुर्लक्ष करण्यात आले. त्याचाच परिणाम काल एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतरच प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. तर गुरुवारी रात्रीच मोहोळ विभागाचे, सोलापूर विभागाचे, अमदनगर विभागाचे व पुणे विभागाचे वनविभागाचे कर्मचारी करमाळा तालुक्यात दाखल झाले आहेत. तर तालुक्यात ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे, त्या ठिकाणच्या भागात बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचणार असल्याची माहिती दिली आहे. तब्बल पाच ते सहा ठिकाणी सापळा रचण्यात येणार आहे. त्यामध्ये जिंती, मोरवड, रोशेवाडी, लिंबेवाडी या भागांचा समावेश आहे.

फुंदेवाडी(रावगांव) ता.करमाळा येथे बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात एका शेतक-याचा मृत्यू झाला त्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आमदार मा.संजयमामा शिंदे यांनी पाहणी केली व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक,यांना पुर्ण तालुक्यात खबरदारी घेणेविषयी सुचना दिल्या. यावेळी त्यांचेसोबत नगरचे मुख्य वनपरिक्षेत्र अधिकारी मा.तेलंग साहेब, सोलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मा.भाटे साहेब, ता.पं.सदस्य, ॲड.राहुल सावंत, तानाजीबापू झोळ, रावगांवचे सरपंच दादासाहेब जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE