अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा शाळा भरली ; पुढारी, नोकरदार व व्यापाऱ्यांसह गृहिणींची हजेरी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात शिस्तप्रिय शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयातील सन 1994/95 या शैक्षणीक वर्षातील इ.10 वी (अ) या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा आणि गुरुजन कृतज्ञता सोहळा नुकताच पार पडला.

रविवार दि:-19 नोव्हेंबर 2023 रोजी हॉटेल राजयोग येथे पार पडलेल्या या त्या सालातील इ 10 वी (अ) मधील जवळपास 35 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि तत्कालीन 22 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जवळपास 28 वर्षांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आल्याने आणि ज्यांनी आपल्याला घडवले असे गुरुजन समोर आल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सर्वप्रथम सदस्यांनी बायपास रोड वर शाळेच्या नवीन इमारतीस भेट दिली आणि नन्तर कार्यक्रम स्थळी रवाना झाले. आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सगळे चांगल्या पदावर कार्य करत आहेत, काही जण
डॉक्टर,इंजिनिअर,पोलीस अधिकारी,शिक्षक, व्यापार उद्योगपती त्याचबरोबर काहींनी राजकीय , सामाजिक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली
त्यांनतर दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनतर उपस्थित सर्व शिक्षकांचे सत्कार उपस्थित सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर विध्यार्थ्यांनी परिचय सांगून आप आपले मनोगत व्यक्त केले यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.आणि सगळे गतकालीन आठवणीत हरवून गेले.
या प्रसंगी विध्यार्थ्यांनी तत्कालीन सर्व गोष्टी लक्षात घेऊन शाळेच्या शिक्षेकेतर कर्मचाऱ्या सोबत त्या वेळी शाळेच्या बाहेर भेळ आणि खारीमुरी विक्री करणाऱ्या दत्ता मामा महाडिक यांचा ही सन्मान केला.आणि समारोपाला चॅट पार्टी त त्याच भेळेचा आणि पाणीपुरीचा आस्वाद सगळ्यांनी घेतला. नाष्टा, चहा,जेवण,चॅट पार्टी,देखणी सजावट अशा परिपूर्ण नियोजनामुळे कार्यक्रमाला शोभा आली.
अशा या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन निलेश कुलकर्णी आणि मधुरा घोडके(पोतदार)यांनी केले. प्रास्ताविक मोहंमदी काझी यांनी केले तर अजय बागल यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.