करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अक्षय काळे राज्यात पहिला – सहा वर्षाचा संघर्ष एकाच वेळी तीन प्रमुख परिक्षा उत्तीर्ण

करमाळा समाचार

आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या वडिलांनी ज्या पद्धतीने कष्ट केले एक वेगळा आदर्श ठेवला. त्याच पद्धतीने आयुष्यात काहीतरी व्हायचंय हा ध्यास घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना कोविड काळात ज्या आजोबांना आयडॉल मानले त्या आजोबांना गमवावे लागले. पण खचून न जाता अभ्यास चालूच ठेवला त्याचे फळ उशिरा का होईना मिळालेच विशेष म्हणजे एका आठवड्यात दोन मोठ्या परीक्षा पास तर तिसरी मुख्य पास होऊन मुलाखत अद्याप बाकी आहे अशी नेत्रदीपक कामगिरी मूळ करमाळा तालुक्यातील वडगाव येथील अक्षय ईश्वर काळे (वय २८) यांनी करून दाखवली आहे.

अक्षय ईश्वर काळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर ची परीक्षा (दि २२) पास झालेला आठवडा होत नाही, तोपर्यंत( दि २८) डिसेंबर रोजी मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षेचा निकाल लागला व त्यात महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान अक्षय यांनी मिळवला आहे. तब्बल तीन लाख विद्यार्थ्यांमधून सदरची निवड होत असताना करमाळा तालुक्यासह बार्शी तालुक्यालाही अभिमानाची बाब आहे. अक्षय चे मूळ गाव करमाळा तालुक्यातील वडगाव आहे. तर हल्ली तो आपल्या कुटुंबासमवेत बार्शी येथील सुर्डी या गावी राहत आहे.

अक्षय काळे यांचे आजोबा ग्रामसेवक होते. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला होता. त्यांची बदली लोक होऊन देत नव्हते. तर आपल्याच गावी अक्षयचे आजोबा मच्छिंद्र काळे यांनी कायम रहावे असे लोकांना वाटत असे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महावितरण मध्ये काम करत असताना अक्षयचे वडील ईश्वर यांनीही कामातील आपले कौशल्य दाखवून दिले होते. ते प्रिन्सिपल ऑपरेटर म्हणून माढा येथील महावितरण मध्ये कार्यरत आहेत. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय यांनी आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. बार्शी, करमाळा, सोलापूर, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपला आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अक्षयने २०१७ मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी सुरुवात केली. या दरम्यान अक्षय ने पाच वेळा पहिली तर तीन वेळा मुख्य परीक्षा पास केली. अक्षय ने पहिल्यांदा सहा वर्षानी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. दरम्यानच्या काळात कोरोना व इतर अडचणी असतानाही त्याने अभ्यास करणे सोडले नाही. तो लढत राहिला जिद्दीने अभ्यास करून त्याने अखेर महाराष्ट्रात पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे. अक्षयने खुल्या प्रवर्गातून ३१५ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. २२ डिसेंबर रोजी एसटीआय २८ डिसेंबर रोजी कक्ष अधिकारी मंत्रालय तर मुख्य परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची सरळ सेवा भरतीची मुख्य परिक्षा उत्तीर्ण होऊन त्या मुख्य परीक्षेच्या निकालाची आतुरता अक्षयला आहे.

प्रतिक्रिया
2017 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. सुरुवातीपासूनच गांभीर्याने,जिद्दीने, सातत्याने अभ्यास केला. मागील काही वर्षात थोड्या थोड्या गुणांनी अपयश येत होते.त्यामुळे होणाऱ्या चुका सुधारल्या आणि नव्या उमेदीने पुन्हा परीक्षा दिली.कुटुंबाच्या आणि मित्रांच्या सहकार्यामुळे आपण हा लढा यशस्वी करू शकलो. त्यात केवळ ४९ जागा असल्याने संघर्ष मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे जिद्द सोडली नाही व अभ्यास सुरु ठेवला त्याचाच लाभ केवळ परीक्षा पास होण्यासाठी नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक येण्यासाठी झाला. या पदावर न थांबता यापेक्षा मोठे पद मिळवण्यासाठी अभ्यास सुरु ठेवणार आहे.
– अक्षय काळे,
ASO महाराष्ट्र राज्यात पहिला
STI महाराष्ट्र राज्यात चौथा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE