ताज्या घडामोडी

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जेवायला ; समर्थकांत नवचैतन्य

करमाळा समाचार

पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी करमाळा तालुका तालुकाध्यक्ष यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत आलेली मरगळ दूर करण्यासाठी संतोष वारे व सहकारी कायम थेट पवार यांच्या संपर्कात राहून काम पाहत होते. यामुळेच सदरचा फरक जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर आता मोहिते यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांनाही बळ मिळाल्याचे जाणवत आहे. येणाऱ्या काळात युवकांची धुरा संतोष वारे यासारख्या कार्यकर्त्यांच्या हातात दिसून येईल त्यामुळे वारे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राष्ट्रवादी पक्षात पडलेली फुट तसेच तालुक्यातील पदाधिकांमध्ये असलेली एकजुट यामुळे पक्षात कायमच वेगवेगळ्या गटामुळे पक्षाची पीछेहाट होत होती नेमके कोणी नेतृत्व करायचे किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली काय निर्णय घ्यायचे हा प्रश्न होता. पक्षाची विभागणी झाल्यानंतर अपक्ष निवडणूक जिंकलेले आमदार संजयमामा हे अजित पवार गटात गेले तर त्यांच्या समर्थकांच्या गळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाची माळ पडली आहे. त्यामुळे मोजक्या कार्यकर्त्यांच्या जीवावर करमाळ्याचे राजकारण करीत असताना संतोष वारे, हनुमंत मांढरे, शिवाजीराव जगताप, गोवर्धन चवरे यासारख्या पदाधिकाऱ्यांनी पक्षला सावरण्याचा प्रयत्न सुरु होता. पण या सर्वामध्ये अंतर्गत धुसफुस असल्याने नेमके नेतृत्व कोणाचे यावरुन कायम विभागणी होत होती.

पण आता मोहिते यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार नारायण पाटील सारखे नेतृत्व राष्ट्रवादीला लाभले आहे. आबा व मोहिते यांनी पक्षात प्रवेश करावा यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. तर राष्ट्रवादीत काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद भूषवलेले संतोष वारे व राणी वारे यांना कायमच पक्षाकडून महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. त्यांनी त्या संधीचे सोनं करणे गरजेचे आहे. सध्या वारे कुटुंबियांची थेट पवारांशी असलेली जवळीक आहे. येणाऱ्या काळात त्यांना या जवळीकीचा लाभ होऊ शकतो. राणी वारे या महिलांचे नेतृत्व करीत झेडपी गट सांभाळत आहेत. तर संतोष वारे यांनी शेतकरी व युवकांचे नेतृत्व करीत एक चांगले काम करून दाखवत आहे.

परवा झालेल्या कार्यक्रमातही वारे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पवारांशी ते कायम चर्चा करताना दिसत होते. तर कार्यक्रम संपल्यानंतर पवार यांनी थेट संतोष वारे यांच्या घरी भेट दिल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये वारे यांची ताकद त्यांच्या कार्यकर्त्यांना दिसून आले आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुढील काळामध्ये राष्ट्रवादीत युवकांचा चेहरा म्हणून संतोष वारे यांना संधी दिली जाईल. यामुळे त्यामध्ये उत्साही वातावरण आहे. यामुळे या लोकसभेत त्यानी मन लाऊन काम केल्यास मोहिते यांना लाभ मिळेल तर वारे यांना पक्षाकडुन मोठी संधीही मिळु शकते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE