करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

एकाच दिवशी एकाच वेळी तीनही उमेदवारी दाखल होणार ; परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी

करमाळा समाचार 

करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या दिवशी आज तीनही गट उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने करमाळा तहसील परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून माजी आमदार नारायण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आज प्रमुख गटांपैकी उमेदवार अर्ज दाखल करतील.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवट दिवस असताना आजच्या दिवशी महत्त्वाच्या वेळी आमदार संजय मामा शिंदे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल व प्रा. रामदास झोळ हे तिघेही एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी करमाळा तहसील परिसरात पोहोचले आहेत.

तीनही गटांच्या वतीने अगदी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असून कोणत्याही गटाकडून मोठे शक्ती प्रदर्शन होताना दिसलेले नाही. मागील वेळी नारायण पाटील यांनीही भरलेल्या उमेदवारी अर्ज च्या वेळी अगदी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आताही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर अर्ज भरणे सुरू आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE