करमाळ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ; जगताप गटाची निवडणूकीबाबत धक्कादायक निर्णय
करमाळा समाचार

पंचायत समीती जिल्हा परिषद निवडणुकात मोठा ट्विस्ट आला असुन तालुक्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निवडणुकातुन माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. याशिवाय विद्यमान आमदारही तुतारी चिन्हावर न लढता विकास आघाडीवर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हा धक्कादायक निर्णय मानला जात आहे.

महाराष्ट्र भरात सुरु असलेला गोंधळाला माजी आमदार वैतागून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता शंभुराजे जगताप यांनी फॉर्म भरला असला तरी त्यांनाही माघार घ्यावी लागेल त्यामुळे कार्यकर्तेही माघार घेतील हे निश्चित झाले आहे. तर आपण अजुनही शिवसेनेत असुन माझा उमेदवार नसल्याने योग्य वेळी योग्य भुमिका घेईल असे जाहीर केले.
याशिवाय येणाऱ्या काळात जगताप गट पुर्ण ताकदीने उभा राहिले असे सांगताना यंदाच्या निवडणूकीत मतदारांनी योग्य उमेदवार निवडून द्यावे असे सांगितले. तर २०२९ ला खुप वेळ आहे तेव्हा काय करु हे दिसेलच असे ही सांगितले.


