करमाळा

कै. नामदेवराव जगताप यांच्यानंतर कुकडीच्या पाण्यावर नुसते राजकारण ; पाणी आणण्यासाठी कमी पडले सगळेच आमदार

प्रतिनिधी सुनिल भोसले

 

करमाळा बायपास श्रीदेवीचा माळ रोड येथे शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्या साठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य व दादासाहेब जाधव आण्णा सुपनर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी दशरथआण्णा कांबळे बोलताना म्हणाले, करमाळा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे दहिगाव उपचा सिंचन योजनेखाली येणाऱ्या लाभक्षेत्रातील सर्व तलाव पाण्याने भरून घ्यावे सध्या पांडे म्हसेवाडी तलाव कोरडा पडला आहे. तो तात्काळ उजनीच्या पाण्याने भरून घ्यावा. सध्या उजनी धरण शंभर टक्के भरले असल्याने अतिरिक्त पाणी सर्व लाभक्षेत्रातील गावांना सोडावे. त्याचप्रमाणे कै.नामदेवराव जगताप यांच्या कल्पनेतून 1980 साली मांगी तलावात कुकडी प्रकल्पतून पाणी आणण्यासाठी योजना ‌मंजूर झाली झाली होती. नंतर कै. नामदेवराव जगताप यांच्या पराभवानंतर कुकडीच्या पाण्यावर राजकारण सुरू झालं जवळ जवळ 40 वर्षे झाले तालुक्यातील कित्येक आमदार झाले. पंरतू मांगी तलाव कुकडीच्या लाभक्षेत्राखली मंजुर करून कोणत्याच आमदारांनी आणला नाही. उलट मांगीत कुकडीचे पाणी आण्यावरून राजकारण सुरू झाले म्हणून आम्ही शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने प्रमुख मागणी करत आहोत.

कुकडी‌ धरणाचे अतिरिक्त पाणी मांगी तलावात सोडल्यास 24 गावांना फायदा होईल. परंतु कुकडी प्रक्लप मांगी लाभ क्षेत्रात येत नसल्याने प्रशासन पाणी सोडत नाही म्हणून येथुन पुढे आमदार खासदार यांच्या भरवस्यावर न बसता जनतेने एकत्र येऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. यासाठी आम्ही शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने आमच्या जिवात जीव आहे तोपर्यंत शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहुन कुकडीचे अतिरिक्त पाणी मांगी लाभक्षेत्रात अधिकृत आण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार. येथुन पुढे होणारी सर्व आंदोलने शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी रक्ताचा‌ थेंब सांडेपर्यत लढत राहणार आज रस्ता रोको करण्यात साठी तालुक्यातील जनतेला आवाहन केले होते. कोरोनाचे संकट महाभयंकर असल्याने रस्त्यावर न येता घरीच सुरक्षित राहा आम्ही लाभक्षेत्रातील सर्व सरपंच व पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून रस्ता रोको करण्याचे नियोजन केले म्हणुन तालुक्यातील पहिलाच रस्ता रोको असेल फक्त पदाधिकारी व सरपंच यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष वारे, रायगावचे सरपंच दादासाहेब जाधव, पांडे सरपंच गोरख अनारसे , पांडे माजी सरपंच तुकाराम क्षिरसागर शहाजी ठोसर अनिल तेली सुनिल खारे आण्णा सुपनर भागवत दुधे हिवरवाडीचे सरपंच चर्तुभुंज इरकर गणेश इरकर,चांगदेव साहेब, पिंपळवाडी सरपंच मधुकर काळे,वैजिनाथ बनकर शामराव जाधव,दत्ता घोडके,आप्पा‌ भोसले ग्रापंचायत सदस्य मारूती भोसले, पंचायत समिती सदस्य मुळे,व लाभक्षेत्रातील सर्व आजी माजी सरपंच व विविध विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमन , इत्यादी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE